उपदेश देण्यापेक्षा गोळा केलेल्या 25 लाख कोटींचा हिशोब द्यावा; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

वाढत्या महागाईला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पेट्रोल व डिझेल वरील कर कपातीच्या व वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आज काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “राज्य सरकारकडून पेट्रोल व डिझेलवरील काही कर नुकताच कमी करण्यात आलेला आहे. अशात केंद्र सरकारकडून कर कमी करण्यावरून उपदेश दिले जात आहेत. त्यांनी कुणालाही उपदेश त्यांनी शिकवू नये. या सरकारने सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारच्या कराच्या रूपाने आतापर्यंत 25 लाख कोटी गोळा केले आहेत. त्याचा हिशोब देणार आहे का? तो अगोदर द्यावा. तसेच महागाईला संपूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

आज कराड येथील जुन्या कोयना पूलावरील वरील हलक्या वाहनांच्या वाहतुकीचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती ही बिकट आहे. कारण जीएसटीचे जे अधिकृत देणे आहे. ते देखील केंद्र सरकार राज्य सरकारला देत नाही.

त्यामुळे हा राज्याच्या आणि केंद्र सरकारमधील मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री हे आक्रमक झाले आहेत. राज्य व संघ राज्याची समानव्याची भूमिका आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर हे काय चालले आहे तुम्हचे? एका बाजूला दादागिरी करून राज्याचे सगळे करचे सोर्स कमी केलेले आहेत. आणि वर म्हणत आहेत कि कर कमी करा. त्यामुळे याबद्दल पुणर्विचार झाला पाहिजे अशी मागणी चव्हण यांनी केली.

केंद्र सरकारने कुणालाही उपदेश शिकवू नये

जीएसटीच्या पार्लमेंटने मंजूर केलेल्या कायद्याप्रमाणे केंद्र सरकार राज्यांना जीएसटीचे वेळेवर पैसे का देत नाही? याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे. त्यामुळे आमची मागणी आहे कि पेट्रोल, डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणा. तसे केल्यास सर्व वादच मिटून जाईल. केंद्र सरकारने कुणालाही उपदेश शिकवायचे काही कारण नाही. या महागाईला संपूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्र्यांचे अर्थव्यवस्थेवरील संपूर्णपणे नियंत्रण सुटलेले आहे. त्यामुळे भरमसाठ तेलाच्या किमती वाढत आहेत. हि चूक त्याच्या लक्षात आली असून ती सुधारण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात असल्याचे असे चव्हाण यांनी म्हंटले.