RBI चा नवीन नियम लागू!! 1 जुलैपासून या बँक ग्राहकांना करता येणार नाही क्रेडिट कार्ड पेमेंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 1 जुलैपासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवे नियम लागू होणार आहेत. RBI च्या या नव्या नियमांमुळे क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यामुळे क्रेडिट कार्डची सर्व पेमेंट BBPS द्वारे करावी लागणार आहेत. पेमेंट इकोसिस्टममध्ये कार्यक्षमता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी आरबीआयकडून हे नियम लागू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जुलैपासून लागू होणाऱ्या नियमांमुळे क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये काही बदल होणार आहेत. ज्याचा PhonePe, Cred, BillDesk आणि Infibeam Avenues सारख्या प्लॅटफॉर्मवर परिणाम होईल. सध्या क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी 34 बँकांपैकी फक्त 8 बँकांनी BBPS वर बिल पेमेंट सक्रिय केले आहे. ज्यात एसबीआय कार्ड, BOB कार्ड, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँकांचा समावेश आहे.

महत्वाचे म्हणजे, ग्राहकांना क्रेडिट कार्ड देणाऱ्या HDFC बँक, ICICI बँक आणि Axis अशा महत्त्वाच्या बँकांनी BBPS सक्रिय केलेले नाही. या बँकांनी BBPS सक्रिय न केल्यामुळे PhonePe आणि Cred सारख्या 30 जूननंतर बँकांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड पेमेंट्द्वारे व्यवहाराची प्रक्रिया करू शकणार नाहीत. आतापर्यंत याच बँकांनी तब्बल 5.1 कोटी क्रेडिट कार्ड जारी केले आहेत. परंतु त्यांनी BBPS प्रकिया पुर्ण केलेली नाही.