नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन बँकांना काही निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात दिल्ली आणि बिजनौरच्या सहकारी बँकांची नावे आहेत. या बँकांना सुपरवायझरी एक्शन फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत विशिष्ट ऑर्डरचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. बिजनौर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला RBI ने सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संचालकांना कर्ज देण्यास मनाई करण्याचे आदेश न पाळल्यामुळे बिजनौर सहकारी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, नवी दिल्ली यांनाही पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
RBI ने कारणे दाखवा नोटीस बजावली
या बँकांवर दंड आकारण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती, त्या बदल्यात बँकांकडून जाब विचारला गेला. बँकांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे RBI ने त्यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. यानंतर RBI ने त्यांच्यावर दंड आकारण्याचा निर्णय घेतला.
ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही
RBI ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,”दोन्ही सहकारी बँकांवर नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या करारावर किंवा व्यवहारावर कोणतेही बंधन असेल. याचा परिणाम या दोन सहकारी बँकांच्या ग्राहकांवर होणार नाही.”
‘या’ बँकांनाही दंड ठोठावण्यात आला
यापूर्वी RBI ने PNB (Punjab National Bank) आणि BoI (Bank of India) वर दंडही लावला होता. या बँकांना निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला. बँक ऑफ इंडियाला 4 कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा