RBI ने देशातील ‘या’ सर्वात मोठ्या खासगी बँकेला ठोठावला दहा लाख रुपयांचा दंड, यामागील कारणे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँक (HDFC Bank) ला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँकेने ही माहिती स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली आहे. खरं तर, एचजीएफसी बँक सबसिडीरी जनरल लेजरमध्ये अनिवार्य किमान भांडवल राखण्यात अयशस्वी ठरली, त्यानंतर एसजीएल बाउंस (SGL Bounce) झाला. RBI ने एचडीएफसी बँकेला 9 डिसेंबर रोजी आदेश दिला होता आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे 10 डिसेंबर रोजी हा खुलासा झाला आहे.

ऑर्डरमध्ये RBI ने काय म्हटले?
RBI ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, HDFC ने SGL च्या बाऊन्ससाठी 10 लाख रुपये आर्थिक दंड आकारला आहे. 19 नोव्हेंबर रोजी बँकेच्या सीएसजीएल अकाउंट (Constituent Subsidiary General Ledger, CSGL Account) मध्ये काही सिक्युरिटीजमधील शिल्लक कमी झाली. आरबीआयच्या या आदेशानंतर एचडीएफसी बँकेचे शेअर्स (Shares of HDFC Bank) शुक्रवारी 1,384.05 रुपयांवर व्यापार करताना दिसले.

https://t.co/f0xIGvqhOJ?amp=1

SGL काय आहे ?
सबसिडीरी जनरल लेजर हे एक प्रकारचे डिमॅट खाते आहे ज्यात बँकाद्वारे सरकारी बाँड ठेवले जातात. सीएसजीएल बँकेमार्फत उघडले जाते, ज्यामध्ये बँका ग्राहकांच्या वतीने बाँड ठेवतात. जेव्हा बॉण्डचे व्यवहार अयशस्वी झाले तर एसजीएल बाउन्स होतो.

https://t.co/N2a1zC7bbD?amp=1

डिजिटल लाँचिंगवर बंदी
नुकत्याच आरबीआयने आपल्या प्रोग्राम डिजिटल 2.0 (Program Digital 2.0) अंतर्गत बँकेच्या डिजिटल बिजनेस जनरेटिंग अ‍ॅक्टिव्हिटीज (Digital Business Generating Activities) सुरू करण्यावर बंदी आणली आहे आणि ग्राहकांसाठी नवीन नवीन क्रेडिट कार्डचे (HDFC Credit Card) सोर्सिंग करण्याला प्रतिबंधित केल्याच्या घोषणेनंतर शेअरच्या मूल्यांकनात घट झाली आहे.

https://t.co/wkoA8plQmm?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment