हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI Monetary Policy : नुकतीच RBI च्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पार पडली आहे. यामध्ये अनेक घोषणा करताना RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की,” सेंट्रल बँकेकडून आता QR-आधारित व्हेंडिंग मशीनचा पायलट प्रकल्प सुरू केला जाणार आहे. बाजारात नाण्यांची उपलब्धता वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 12 शहरांमध्ये ते सुरू केले जाणार आहे.हे जाणून घ्या कि, UPI च्या माध्यमातून या मशिन्सचा वापर करता येईल. तसेच याद्वारे नोटांऐवजी नाणी दिली जातील.
RBI गव्हर्नरने 2023 च्या त्यांच्या पहिल्या आर्थिक भाषणात रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही सलग सहावी वेळ आहे जेव्हा RBI कडून रेपो दरात वाढ केली जात आहे. रेपो दर आता 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे आधीच कर्ज आहे त्यांच्यासाठी EMI महाग होईल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत 6 पैकी 4 लोकांनी रेपो दर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले. RBI Monetary Policy
महागाई नियंत्रणात येण्याची अपेक्षा
2023 या आर्थिक वर्षासाठी CPI आधारित महागाईचा दर हा मागील आर्थिक वर्षातील 6.7 टक्क्यांच्या तुलनेत 6.5 टक्के राहण्याचा अंदाज गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये ते 5.3 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची अपेक्षा आहे. RBI गव्हर्नर दास यांच्या म्हणण्यानुसार, रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळाल्याने खाद्यपदार्थांची महागाई कमी होईल. RBI Monetary Policy
RBI Governor Shaktikanta Das announces that RBI increases the repo rate by 25 basis points to 6.5% pic.twitter.com/2ZyUSbCxEO
— ANI (@ANI) February 8, 2023
भारताचा विकास दराबाबत शक्तीकांत दास म्हणाले की…
भारताच्या विकास दराबाबत शक्तीकांत दास म्हणाले की, ” इतर आशियाई चलनांपेक्षा भारतीय रुपया जास्त स्थिर आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताचा वास्तविक विकास दर 6.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे.” तसेच दास यांच्या मते, एप्रिल-जून 2023 तिमाहीत ते 7.8 टक्क्यांवर पोहोचेल, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 7.1 टक्के होता. याशिवाय, जुलै-सप्टेंबरमध्ये 5.9 टक्के, ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 6 टक्के आणि जानेवारी-मार्च 2024 मध्ये 5.8 टक्के वाढीचा अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. RBI Monetary Policy
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.rbi.org.in/scripts/Annualpolicy.aspx
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा