नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मॉनिटरी पॉलिसी कमिटीने (MPC) 7 एप्रिल रोजी धोरणात्मक दर 4 टक्के राखून ठेवला आहे. याशिवाय पेमेंट बँकांसाठी RBI ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. डिजीटल पेमेंट्स बँक, पेटीएम पेमेंट्स बँक, एअरटेल पेमेंट्स बँक यासह RBI च्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकला बुधवारी मोठे प्रोत्साहन मिळाले. रिझर्व्ह बँकेने पेमेंट बँकांसाठी डिपॉझिट लिमिट वाढविले आहे. बँकेने आता ती 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. बऱ्याच काळापासून पेमेंट बँका डिपॉझिट लिमिट वाढवण्याची मागणी करीत होत्या. आता त्यांना RBI च्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
किरकोळ महागाई 5 टक्क्यांच्या आसपास राहू शकते
RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) म्हणाले की,”रिझर्व्ह बँक पेमेंट वॉलेटच्या अपग्रेडेशनवरही काम करत आहे. युझर्सना एका वॉलेटमधून दुसर्या वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे.” आत्ता, गूगल पे किंवा पेटीएमच्या वॉलेटमधून पैसे एकमेकांच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकत नाहीत. त्याखेरीज नवीन आर्थिक वर्षातील पहिली पॉलिसी जाहीर करताना RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सांगितले की,”किरकोळ चलनवाढ आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत 5 टक्क्यांच्या आसपास असेल तर पूर्वीच्या अंदाजानुसार 5.2 टक्के होता.”
जीडीपी वाढीचा अंदाज 10.5%
त्याच वेळी, RBI ने आर्थिक वर्ष 2022 मधील जीडीपी वाढीचा अंदाज 10.5% ठेवला आहे. RBI ने म्हटले आहे की,” जागतिक वाढीमध्ये हळूहळू रिकव्हरी होत आहे, परंतु अद्याप सर्व प्रकारची भीती आणि अनिश्चितता कायम आहे.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा