RBI | RBI ने ‘या’ 2 मोठ्या बँकांवर केली कठोर कारवाई; ठोठावला 1 कोटी 90 लाखांचा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

RBI | देशातील सर्व आर्थिक घडामोडीवर आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व बँकेची चांगलीच नजर असते. आता आरबीआयने पुन्हा एकदा देशातील मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आरबीआयकडून आयसीआयसीआय आणि एस बँक या दोन खाजगी क्षेत्रातील बँकांविरोधात कारवाई केलेली आहे. आरबीआयने (RBI ) आखून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने ही कार्यवाही केलेली आहे. आयसीआयसीआय वर एक कोटी रुपये तर एस बँकेवर 90 लाख रुपयांचा दंड देखील ठरवण्यात आलेला आहे. आता ही कारवाई नेमकी का केली? हे आपण जाणून घेणार आहोत.

आरबीआयने (RBI) देशातील सर्व लहान-मोठ्या बँकांना काही नियम आखून दिलेले होते. परंतु आरबीआयकडून आखण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली केल्यामुळे कारवाई केलेली आहे. त्यामुळे या कारवाई अंतर्गत आरबीआयने या दोन मोठ्या बँकांवर एक कोटी 90 लाख रुपयांचे कारवाई केलेली आहे. कार्यालयीन कामामध्ये चुकीच्या पद्धतीने व्यवहार केल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतलेला आहे. आरबीआय बँकिंग नियमन अधिनियम 1949 अंतर्गत आयसीआयसीआय आणि एस बँकेवर कारवाई करण्यात आलेली आहे.

खातेधारकांवरही होणार परिणाम ? | RBI

आरबीआयने घेतलेल्या या मोठ्या नेल्यानंतर दोन मोठ्या बँकांवर कारवाई होत असतानाच, बँकेचा आर्थिक गुरदंड त्यांच्या खातेधारकांनाही होणार आहे का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. परंतु याचा खातेधारकांवर परिणाम होणार नाही. किंबहुना या दंडाच्या रकमेच्या बँकेच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये बँकांची कार्यपद्धती सुरळीत होणार आहे. त्यामुळे खातेधारकांना याबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.