निर्देशांक वधारला…! RBI कडून रेपो दर 4 % तर रिझर्व रेपोदर 3. 35 % वर स्थिर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : रिझर्व बँकेकडून नव्या आर्थिक वर्ष 20121-22 मधील पहिले पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी कोरोना ची परिस्थिती लक्षात घेता व्याजदर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत. यावेळी रेपो दर 4 % तर रिझर्व रेपोदर 3. 35 % वर स्थिर ठेवण्यात आला आहे. याची घोषणा होतात सकाळी निर्देशांकात वाढ दिसून आली.

आज बुधवारी(7एप्रिल )सकाळी 10.15 वाजता BSE S&P निर्देशांक 343 अंकांनी वधारला. 0.7 टक्के 49,544 इतका झाला. तर निफ्टी 50 अंकांनी वधारून 94 पॉईंट वर 0.64टक्के 14,778 वर पोहचले.

तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये देखील सकारात्मकता दिसून आली. निफ्टी मेटल पॉईंट 1.3%, पासून बँक 0.9%, ऑटो 0.7% नी वधारले आहे.

*अदानी पोर्ट्स 2.9 अंकांनी वधारले*

अदानी पोर्ट 2.9 टक्‍क्‍यांनी वाढून 859.95 पर शेअर झाले आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये 1.7% वाढून 2,018 रुपये पर युनिट झाले आहे.

दरम्यान, टाटा स्टील, हिंदाल्को भारती एअरटेल,इंडियन ऑईल कार्पोरेशन आणि डॉक्टर रेड्डी यांच्या शेअरमध्ये देखील वाढ झाली आहे.

तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,टेक महिंद्रा,विप्रो कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि सिपला यांचा तोटा झाला आहे.

दरम्यान 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी जीडीपीचा दर 10.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे. तसेच भारतीय वित्तीय संस्थांना 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार असल्याची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.

Leave a Comment