हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Torn Notes : आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यवहार करताना बऱ्याचदा लोकांकडे जुन्या किंवा फाटलेल्या नोटा येतात. बाजारात कोणताही दुकानदार अशा नोटा घेत नाही. यामुळे अनेकदा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सामान्यत: लोकं फाटक्या नोटा बदलणाऱ्या दुकानदारांकडे जाऊन त्यांच्याकडून नोटा बदलून घेतात. मात्र हे दुकानदार त्यासाठी काही कमिशन घेतात. मात्र आता याबाबत काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता बँकेत जाऊन फाटलेल्या नोटांऐवजी नवीन नोटा (मुटिलेटेड नोट एक्सचेंज) घेता येतील. जर ग्राहकाने दिलेली कापलेली किंवा फाटलेली नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करत असेल, तर कोणतीही बँक ती बदलण्यास नकार देऊ शकत नाही.
मात्र, एकाच वेळी किती नोटा बदलता येतील साठी RBI कडून मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. तसेच, इथे हे लक्षात घ्या कि, आपल्याला कोणत्याही सहकारी बँक, प्रादेशिक बँक आणि ग्रामीण बँकेमध्ये जाऊन नोटा बदलून घेता येत नाही. या नोटा फक्त खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये बदलून घेता येतील. तसेच यासाठी ज्या शाखेत आपण नोटा बदलून घेणार आहात त्या बँकेमध्ये खाते असण्याची आवश्यकता भासणार नाही. Torn Notes
एकाच वेळी किती नोटा बदलता येतील ???
हे जाणून घ्या कि, एका व्यक्तीला एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलता येतील. मात्र, या वीस नोटांचे मूल्य 5,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच 20 च्या नोटा आणि मूल्य 5 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर बँकेकडून लगेचच नोट बदलून दिली जाईल. तसेच यापेक्षा जास्त रकमेची देवाणघेवाण केल्यास, बँकेकडून फाटलेल्या नोटा आपल्याकडे ठेवल्या जातील आणि ग्राहकाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील. मात्र यासाठी थोडा वेळ लागेल. Torn Notes
किती पैसे मिळतील ???
आपल्याकडील फाटलेल्या नोटेची किंमत ही आपली नोट किती फाटली आहे यावर अवलंबून असेल. जर 2000 रुपयांची नोट 88 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर त्याची पूर्ण किंमत दिली जाईल. तसेच जर याचा फक्त 44 चौरस सेंटीमीटर भाग असेल तर अर्धी रक्कम दिली जाईल. त्याचप्रमाणे 200 रुपयांच्या फाटलेल्या नोटेचे 78 स्क्वेअर सेंटीमीटर भाग सुरक्षित असेल तर पूर्ण पैसे मिळतील, मात्र 39 स्क्वेअर सेंटीमीटर भागासाठी फक्त अर्धेच पैसे मिळतील. Torn Notes
हे चिन्ह असणे आवश्यक आहे
बँकेकडून फक्त त्याच चलनी नोटा बदलल्या जातील. ज्यावर सीरियल नंबर, गांधीजींचे वॉटरमार्क, गव्हर्नरची स्वाक्षरी इत्यादी सिक्योरिटी साइन दिसत असतील. जर या खुणा नोटेवर नसतील तर बँक नोटा बदलून देणार नाही. Torn Notes
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonperson/English/Scripts/Notification.aspx?Id=2652#:~:text=All%20other%20persons%20tendering%20mutilated,days%20of%20receipt%20of%20notes.
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा