American Express सहित ‘या’ 2 कंपन्यांविरूद्ध RBI ची कडक कारवाई, यापुढे क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्पोरेशन (American Express Banking Corp) आणि डिनर्स क्लब इंटरनेशनल लि. (Diners Club International Ltd) या बँका 1 मेपासून आपल्या नवीन ग्राहकांना कार्ड जारी करू शकणार नाहीत. डेटा स्टोरेजशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल RBI ने हे निर्बंध लादले आहेत. शुक्रवारी RBI ने एक निवेदन जारी केले की,” या आदेशाचा सध्याच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.”

अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग कॉर्पोरेशन आणि डिनर्स क्लब इंटरनॅशनल लिमिटेड हे पेमेंट सिस्टम ऑपरेटर आहेत ज्यांना पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अ‍ॅक्ट 2007 (पीएसएस अ‍ॅक्ट) अंतर्गत देशातील कार्ड नेटवर्क्स ऑपरेट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे या कंपन्या या कायद्यांतर्गत देशातील क्रेडिट कार्ड इ. जारी करू शकता.

सध्याच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही
RBI म्हणाले, “ही युनिट पेमेंट सिस्टमशी संबंधित डेटा आणि माहिती संग्रहणासंदर्भातील सूचनांचे पालन करीत नव्हते. या आदेशाचा सध्याच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही.”

23 एप्रिल रोजी आदेश जारी केला
23 एप्रिल रोजी एक आदेश जारी करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या आदेशानुसार, हे दोन्ही पेमेंट ऑपरेटर पेमेंट सिस्टम डेटा स्टोरेजशी संबंधित निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहेत, ज्यामुळे केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय बँकेने ही कारवाई पीएसएस कायद्यांतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांच्या माध्यमातून केली आहे.

अमेरिकन एक्स्प्रेसने काय म्हटले?
या आदेशानंतर अमेरिकन एक्सप्रेसने सांगितले की,”RBI च्या या निर्णयामुळे आम्ही दु: खी आहोत. आम्ही त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करत आहोत. याचा आपल्या भारतातील सध्याच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि आमचे ग्राहक पूर्वीप्रमाणेच आमचे कार्ड वापरू शकतील.”

Leave a Comment