हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात, त्याच प्रकारे आता पैशाचा व्यवहार डेटाही देण्यात येईल. खरं तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील विविध पेमेंट सिस्टममधून दररोजच्या व्यवहाराची माहिती देण्यास आता सुरवात केलीली आहे. त्याअंतर्गत आता एटीएममधून पैसे काढण्याविषयीची माहिती मध्यवर्ती बँक एनईएफटी, आरटीजीएस आणि यूपीआयकडून दररोजच्या व्यवहारासह दिली जात आहे.
३ जूनचा डेटा जाहीर
रिझर्व्ह बँकेने दुसर्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी पैशांचा व्यवहाराचा डेटा जाहीरकेला. या आकडेवारीनुसार ३ जून रोजी देशभरातील एटीएम मशीनमधून सुमारे ४,४२६.९२ कोटी रुपये काढून घेण्यात आले. बँकिंग प्रतिनिधींच्या माध्यमातून ६६८.८८ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. देशात आरटीजीएसमार्फत ४.३ लाख व्यवहार झाले, ज्यांचे मूल्य ३३,६३२.८९ कोटी रुपये आहे.
IMPS कडून ७,६५३ कोटींचे व्यवहार
त्याचवेळी एनईएफटीकडून एकूण १००.३६ लाख व्यवहार झाले आणि त्यांचे मूल्य ६२,९८५.७५ कोटी रुपये होते. ३ जून रोजी यूपीआय कडून ४५६.२६ लाख व्यवहार झाले आणि त्यांचे एकूण मूल्य ९,६२२.३८ कोटी रुपये होते. जर आयएमपीएस व्यवहाराबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे मूल्य ७६५३.७१ कोटी रुपये होते. प्रत्येक दिवसाच्या व्यवहाराचा डेटा त्याच्या पुढील कार्यकारी दिवशी जाहीर केला जाईल.
रिझर्व्ह बँक लवकरच एटीएम कार्डवरील व्यवहारांचा दररोजचा डेटादेखील लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी ते एक रिपोर्टिेंग यंत्रणा तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. रिसर्च आणि इनोवेशनच्या उद्देशाने ही आकडेवारी जाहीर केली जात असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे.
कोरोना संकटाच्या वेळी आरबीआयने बँकिंगशी संबंधित नियमांत अनेक बदल केले आहेत. त्याअंतर्गत एटीएममधून पैसे काढण्यासह इतरही अनेक गोष्टींवर ३० जूनपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र, अशी शक्यता आहे की या कालावधीत आणखीनच वाढ होऊ शकेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.