हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank : RBI कडून गेल्या महिन्याभरात रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. यानंतर एकीकडे बँकांच्या कर्जावरील व्याजदर वाढले तर दुसरीकडे फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यामध्ये, आता RBL बँकेने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात बदल केले आहेत.
8 जून 2022 रोजी बँकेकडून याबाबतची घोषणा केली केली गेली आहे. या बदलानंतर आता RBL Bank कडून सर्वसामान्यांना 3.25 ते 5.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.75 ते 6.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
RBL Bank च्या FD चे दर
बँकेकडून 7 ते 14 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.25 टक्के, 15 ते 45 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.75 टक्के, 46 दिवसांपासून ते 90 दिवसांच्या FD वर4.00 टक्के व्याज दर दिला जात आहे. तसेच 91 दिवसांपासून ते 180 दिवसांच्या FD वर 4.50 टक्के व्याज दर मिळतो आहे. RBL Bank सध्या 181 दिवस ते 240 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 5.00 टक्के तर 241 दिवस ते 364 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 5.25 टक्के व्याजदर देत आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rblbank.com/interest-rates
हे पण वाचा :
Multibagger Stocks: ‘या’ 4 आयटी स्टॉक्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट रिटर्न !!!
Credit Card चा पुरेपूर फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या !!!
Business ideas : पांढर्या चंदनाची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!
Credit Card वापरणाऱ्यांनी चुकूनही करू नयेत ‘या’ चुका, अन्यथा होईल मोठे नुकसान
Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद