Real Estate News | यावर्षी देशातील देशांमध्ये नवीन घराच्या पुरवठ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जवळपास 8 महानगरपालिकांमध्ये नव्या घरांचा पुरवठा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच 15 टक्क्यांनी कमी झालेला आहे. मागणी खूप जास्त होती, तरी पहिल्या टप्प्यात म्हणजेच तीमाहीमध्ये 69 हजार 143 नव्या घरांचा पुरवठा करण्यात आला आहे. अशी माहिती बांधकाम क्षेत्रातील या सल्लागार संस्थेने दिलेली आहे. मागील वर्षी आलीशान आणि महागड्या घरांची मागणी वाढत गेली. (Real Estate News) त्याचप्रमाणे लोकांचा कल हा उच्च जीवनशैलीकडे जात असल्याने आगामी काळात विकासकांकडून आलिशान घरांचे प्रकल्प उभारण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 8 महानगरांतील निवासी मालवत्ता क्षेत्राचा तीन महिन्याचा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. या अहवालानुसार आता गेल्या वर्षानुसार याच तीमाहित घरांचा पुरवठा 5% ने कमी झालेला दिसून येत आहे यासोबतच बंगळुरू आणि मुंबई या शहरांमध्ये नव्या घरांचा पुरवठा वाढला आहे. परंतु दिल्ली, चेन्नई, पुणे, कोलकत्ता, हैदराबाद आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये घरांच्या पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे.
या तीमाहीत झालेल्या नवीन गृह प्रकल्पांपैकी 34 टक्के प्रकल्प हे आणि आलिशान घरांचे आहेत. तसेच नव्या गृहप्रकल्पामध्ये नोंदणीकृत आणि मोठ्या विकासकांचे प्रमाण 38% एवढे आहे. असे त्यांनी अहवाला स्पष्ट केले आहे. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये घरांचा पुरवठा 81,176 एवढा होता, तर यावर्षी हा पुरवठा 69,143 एवढा आहे. बंगळुरूमध्ये या नवीन घरांचा पुरवठा 7,777 वरून 8,848 एवढा झालेला आहे. मुंबईमध्ये नव्या घरांचा पुरवठा हा 1963 वरून 19461 एवढा झालेला आहे. तर पुण्यात गेल्यावर्षी नवीन घरांचा पुरवठा हा 13806 एवढा होता तर यावर्षी या नवीन घरांचा पुरवठा 11,358 वर घसरलेला आहे.
अहमदाबाद जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिले तर मागील वर्षी नव्या घरांचा (Real Estate News) पुरवठा 4901 एवढा होता तर यावर्षी हा पुरवठा 4529 एवढा झालेला आहे. चेन्नईमध्ये मागील वर्षी नव्या घरांचा पुरवठा 8144 होता तर यावर्षी 5490 एवढा झालेला आहे. दिल्लीमध्ये नव्या घरांचा पुरवठा मागील वर्षी 7813 होता तर यावर्षी हा पुरवठा 3614 एवढा कमी झालेला आहे.