Realme 9i 5G : 5,000 mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा..; Realme चा दमदार मोबाईल लॉन्च

Realme 9i 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता (Realme 9i 5G) कंपनी रिअलमी ने आपला नवा स्मार्टफोन Realme 9i 5G भारतात लॉन्च केला आहे. हा बजेट स्मार्टफोन Realme 9 सिरीज मधील सर्वात लेटेस्ट डिव्हाइस आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या मोबाईलमधील खास फीचर्स आणि त्याची किंमत …

Realme 9i 5G

6.6-इंचाचा डिस्प्ले- 

Realme च्या या 9i 5G स्मार्टफोनला 6.6-इंचाचा FHD + IPS LCD डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असून 180Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. या मोबाईल (Realme 9i 5G) फोनला MediaTek Dimension 810 SoC देण्यात आले आहे. रिअलमीचा हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो. Realme 9i 5G मध्ये 5,000 mAh बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme 9i 5G

50 MP Camera-

मोबाईलच्या कॅमेरा बाबत बोलायचं झाल्यास, या स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे.  दुसरा 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स आणि तिसरा 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉल साठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, 5G, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर, हेडफोन जॅक आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन सोलफुल ब्लू, रॉकिंग ब्लॅक आणि मेटालिका गोल्ड कलर्समध्ये खरेदी करता येईल.

Realme 9i 5G

किंमत – Realme 9i 5G

Realme 9i 5G ची किंमत त्याच्या स्टोरेज नुसार वेगवेगळी आहे. 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 14,999 रुपये आहे तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा मोबाइल 16,999 पर्यंत मिळू शकतो. हा फोन 24 ऑगस्टपासून Flipkart, Realme.com आणि Realme स्टोअर्सवरून खरेदी करता येईल. ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, ICICI बँक आणि HDFC बँक कार्ड वापरून 1,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

हे पण वाचा :

OnePlus 10T : OnePlusने लॉन्च केला दमदार मोबाइल; फक्त 19 मिनीटांत होणार फुल्ल चार्ज

Asus ROG Phone 6 Pro : 18 GB RAM चा Asus चा दमदार मोबाईल लॉंच; पहा किंमत आणि सर्वकाही

iQOO 9T : लवकरच लॉन्च होणार iQOO चा दमदार मोबाइल; पहा किंमत आणि फीचर्स

Whatsapp वर तुम्हांला कोणी ब्लॉक केलंय?? अशा पद्धतीने करा चेक

Samsung Galaxy Z Fold 4 : Samsung ने लॉन्च केला 2 डिस्प्लेवाला नवा मोबाईल; पहा फीचर्स आणि किंमत