राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यास पवारांचा नकार का?? ‘ही’ 5 कारणे पहाच

Sharad Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समोर करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र खुद्द शरद पवारांनीच आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही अस स्पष्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला. शरद पवारांनी राष्ट्रपती व्हायला रस का दाखवला नाही याबाबतची नेमकी कारणे आणि शक्यता आपण जाणून घेऊया

1) विजयाची शाश्वती नाहीच

भाजपा प्रणित एनडीए स्वतःच्या ताकदीवर राष्ट्रपती निवडणूक जिंकेल अशी परिस्थिती सध्या तरी नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमधील अंतरही जास्त नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. राष्ट्रपती निवडणुकीत एकूण मतदान 10,86,431 आहे. जिंकण्यासाठी 5,43,216 मते हवी आहेत. सध्या एनडीए कडे 5.20 लाख मते आहेत तर विरोधकांकडे 5.60 मते आहेत. मात्र केंद्रात सत्ता असल्याने कधी काय होईल हे सांगता येत नाही.

2) विरोधकांच्या एकीवर प्रश्नचिन्ह

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देशातील सर्व विरोधकांची बैठक बोलावली होती. मात्र आम आदमी, बिजेडी, टीआरएस आणि वायएसआर यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. विरोधकांच्या एकजुटीशिवाय विजय मिळवणे अशक्य आहे, त्यामुळे शरद पवार कोणतीही रिस्क घेणार नाहीत अस वाटतय.

3) पवारांना निवृत्त व्हायचं नाही

शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. मोदी विरोधातील सर्व नेत्यांना एकत्र करण्याची त्यांची क्षमता आहे. अशा वेळी जरी ते राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले तर त्यांना सक्रिय राजकारणा पासून दूर जावे लागेल. आणि पवारांना तेच तर नकोय…. शरद पवार यांची राजकिय महत्वकांक्षा खूप मोठी आहे.

4) तर राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता

शरद पवार हे स्वतः एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. पवार देशात कुठेही असले तरी त्यांच पक्षावर आणि महाराष्ट्रावर बारीक लक्ष असत. अशा वेळी राष्ट्रपती झाल्यास पवारांना सक्रिय राजकारणातून लक्ष काढाव लागलं तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडू शकते. कारण शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

5) 2024 लोकसभा हेच लक्ष

आगामी 2024 लोकसभा निवडणुकीला अवघी अडीच वर्षे बाकी आहेत. शरद पवार यांचे देशपातळीवर अनेक नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे विरोधकांची मोट बांधून केंद्रातील मोदी सरकार उधळून लावण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे. शरद पवारांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक न लढण्यामागे हे सुध्दा महत्त्वाचे कारण असू शकते.