एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला आव्हान; हिंमत असेल तर….

Eknath Shinde Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 हुन अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतरही शिवसेनेकडून सातत्याने बंडखोर गटातील 15-20 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर देत कोण कोण संपर्कात आहेत त्यांची नाव सांगा अस खुल आव्हान दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, येथे 50 लोक आहेत. सर्वजण स्वताच्या मर्जीने आले आहेत. ते खुश असून आनंदी आहेत. त्यामुळे ज्यांनी आमदार संपर्कात आहेत असा दावा केला आहे त्यांनी नाव जाहीर करावी अस शिंदे म्हणाले. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका आहे ती पुढे घेऊन जात आहोत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.त्यामुळे आगामी 2-3 दिवसात राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळू शकते.