सत्तेचा तिढा सुप्रीम कोर्टात; आज सुनावणी पार पडणार

Uddhav Thackeray Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेने गटनेते, प्रतोद नियुक्त्या अवैध पद्धतीने केल्याचा दावा शिंदे गटाने या याचिकेत केला आहे. बंडखोर गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हटवण्याची मागणी केली आहे. झिरवळ यांची हकालपट्टी होत नाही तोवर अर्जावर निर्णय होईपर्यंत १६ आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसीवर कोणीतीही कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे.

 

या दोन्ही याचिकेवर आजच सुनावणी पार पडणार असून शिवसेना आणि शिंदेसेना या दोघांचे भवितव्य सर्वोच न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघ हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत तर हरिश साळवे आणि महेश जेठमलानी एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडतील. संपूर्ण देशाचे लक्ष्य या सुनावणी कडे असेल