हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plan : येत्या काही दिवसांत देशातील कोट्यवधी मोबाईल युझर्सना इंटरनेटच्या वापरासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कारण आता टेलिकॉम कंपन्यांकडून पुन्हा एकदा मोबाईलचे दर वाढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपन्यांकडून दरात वाढ केली गेली होती. मात्र आता टॅरिफ प्लॅनच्या किंमतीतील ही वाढ फक्त प्री-पेडपुरती मर्यादित असणार नाही तर पोस्ट पेड प्लॅनच्या किंमती देखील वाढतील. गेल्या नोव्हेंबरमध्ये कंपन्यांनी 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली होती.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेलिकॉम कंपन्या 5G सर्व्हिस सुरू करण्यासाठी फंड उभारण्यासाठी टॅरिफ वाढवू शकतात. ज्यामुळे मोबाईलचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 5G सर्व्हिस चालवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना 1.5 ते 2 लाख कोटी रुपये गुंतवावे लागतील असे मानले जाते आहे. ज्यामुळे कंपन्या सध्याच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. Recharge Plan
फिच रेटिंग्स आणि जेएम फायनान्स या रेटिंग एजन्सींनाही असा विश्वास आहे की, मोबाइल प्लॅनच्या दरात लवकरच वाढ होऊ शकते. जेएम फायनान्सच्या रिपोर्ट्सनुसार, टेलिकॉम कंपन्या 5G रोलआउट फंड उभारण्यासाठी दोन किंवा तीन हप्त्यांमध्ये टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवू शकतात. तसेच दुसरीकडे, फिचच्या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की, कंपन्या 15 ते 20 टक्क्यांपर्यंत दरवाढ करू शकतात. इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, व्होडाफोन आयडियाच्या सीईओनेही काही काळापूर्वी दर वाढ करण्याविषयी सांगितले होते. Recharge Plan
मोबाईल टॅरिफच्या किंमती नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटच्या टप्प्यात वाढल्या होत्या. त्यानंतर कंपन्यांनी किंमती 20 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. यावेळी Airtel ने दरात 25 टक्के वाढ केली होती तर Vi ने 20 ते 25 टक्क्यांनी दर वाढवले होते. आता कंपन्यांनी दरवाढ केली तर सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. Recharge Plan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/recharge-online
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का !!! आता EMI साठी मोजावे लागणार जास्त पैसे
Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या