हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्य दिनानिमित्त रिलायन्स Jio कडून ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर लाँच करण्यात आली आहे. या अंतर्गत जिओकडून 2,999 रुपयांच्या रिचार्जवर पुढील 365 दिवसांसाठी डेली 2.5 GB डेटा दिला जाणार आहे. यासोबतच ग्राहकांना Disney + Hostar चे मोबाईल सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
या रिचार्जसह, कंपनी आपल्या ग्राहकांना Ajio वर 750 रुपये, Netmeds वर 750 रुपये आणि Exigo वर 750 रुपये सूट देत आहे. यासोबतच 750 रुपयांचा अतिरिक्त 75 जीबी डेटा देखील दिला जात आहे. हे लक्षात घ्या की, या वर्षी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.ज्यामुळे जिओ कडून ही ऑफर दिली जात आहे.
Jio कडून 5G साठी तयारी सुरू
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio ने सुमारे 1,000 शहरांमध्ये 5G सर्व्हिस सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. जिओने आपल्या स्वदेशी विकसित केलेल्या 5G दूरसंचार उपकरणांची चाचणी देखील घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की,” त्यांच्या टेलिकॉम शाखेने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 100% स्वदेशी तंत्रज्ञानासह 5G सर्व्हिस देण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स जिओ सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे. या लिलावात लावलेल्या 1.50 लाख कोटी रुपयांच्या बोलींपैकी एकट्या जिओकडून 88,078 कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या.
Jio ने कोणता स्पेक्ट्रम मिळवला ???
टेलिकॉम विभागाने आयोजित केलेल्या या लिलावात भारतातील सर्वात मोठी डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या Jio ने 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz बँडमध्ये स्पेक्ट्रम मिळवले आहेत. हे स्पेक्ट्रम Jio ला जगातील सर्वात प्रगत 5G नेटवर्क बनविण्यात आणि वायरलेस ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीमध्ये भारताचे जागतिक नेतृत्व आणखी मजबूत करण्यात मदत करेल. Jio चे 5G नेटवर्क नेक्स्ट जनरेशन डिजिटल सोल्यूशन्स सक्षम करेल जे भारताला 5+ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यास प्रवृत्त करेल.
4G पेक्षा 5G कसे चांगले आहे ???
5G हे एक नवीन नेटवर्क आहे ज्याद्वारे आधीपेक्षा वेगवान इंटरनेट स्पीड आणि अल्ट्रा लो-लेटन्सी (अत्यंत कमी व्यत्यय) मिळेल. यामध्ये ग्राहकांना जास्त विश्वासार्ह नेटवर्क क्षमता मिळेल. 4G च्या तुलनेत, 5G तंत्रज्ञान जास्त चांगल्या इंटरफेससह येईल. टेलिकॉम विभागाचे म्हणणे आहे की 5G स्पेक्ट्रमवर आधारित सर्व्हिस सुरू केल्याने 4G पेक्षा 10 पट वेगाने डाउनलोड करता येतील आणि स्पेक्ट्रमची क्षमता देखील सुमारे तीन पटीने वाढेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-list/?
हे पण वाचा :
Aadhar card मध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख किती वेळा बदलता येईल ??? अशाप्रकारे जाणून घ्या
1000 कोटींच्या Money Laundering प्रकरणी ED कडून 10 क्रिप्टो एक्सचेंजची चौकशी – रिपोर्ट
Multibagger Stock : गेल्या 20 वर्षांत ‘या’ ऑटो कंपनीच्या शेअर्सने दिला 41,900 टक्के रिटर्न !!!
Bank of Baroda च्या ग्राहकांना धक्का, आता कर्जाचे EMI महागणार !!!
Gold Price Today : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर तपासा