सकलेन मुलाणी सातारा
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भाबद्दलच्या (Maharashtra-Karnataka border issue) उच्चाधिकार समितीचे महाराष्ट्र सरकारने पुर्नगठन केले आहे. सर्वपक्षीय समितीमध्ये काँग्रेस कडून पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कडून शरद पवार, अजित पवार शिवसेनेकडून अंबादास दानवे यांच्यासह शिंदे सरकारमधील काही मंत्र्याचा समावेश आहे.
शासनाने काल जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबद्दलच्या (Maharashtra-Karnataka border issue) पुर्नगठीत उच्चाधिकार समितीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष असतील व विविध राजकीय पक्षांचे इतर १४ सदस्य असतील. सदर समितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. शरद पवार, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, व शंभूराज देसाई हे मंत्री, तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, व विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबद्दल (Maharashtra-Karnataka border issue) सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या विवादामध्ये राज्याची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी या समितीकडून मार्गदर्शन अपेक्षीत आहे. या समितीची पहिली बैठक येत्या सोमवारी, दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय