सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 256 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 284 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 779 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 79 हजार 082 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2422 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोमुक्तीचा व बाधितांचा आकडा जवळपास समसमान असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दिवसभरात 2 हजार 54 रूग्ण बरे होवून घरी गेले, ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. मात्र बुधवारी रात्री नव्याने आलेल्या 2 हजार 256 बांधितांच्यामुळे जिल्ह्यातील सर्वात रेकाॅर्डब्रेक आकडा आलेला असून चिंताजनक आहे. तर मंगळवारी दिवसभरात 34 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाल आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा