ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोजंदारी कर्मचारी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ओमिक्रोन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 123 कंत्राटी तत्त्वावर नर्स, लस टोचण्याची भरती केली जात आहे. याअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकत्याच 264 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील 80 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. मात्र विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांची 16 पदे रिक्त आहेत. त्यासोबत काही कर्मचारी स्टाफ नर्स आणि अन्य कर्मचारी रजेवर असतात याचा परिणाम लसीकरण मोहिमेवर होत असतो.

ही बाब गांभीर्याने घेत लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर नर्स, लस टोचकांची 123 पदे रोजंदारी तत्त्वावर भरण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी 8 डिसेंबर रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार नुकत्याच 264 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. औरंगाबाद तालुक्यात 28 पदांसाठी 128 जणांनी मुलाखती दिल्या, तर सर्वात कमी 4 पदे सोयगाव तालुक्यासाठी 4 उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली आहे. उमेदवारांना प्रतिदिन 500 रुपये मानधन दिले जाणार आहे.

Leave a Comment