हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या देशामध्ये अनेक तरूण नोकरीच्या शोधात आहेत. अशा तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 670 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे सध्या जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब अशा विविध पदांसाठी तब्बल एकूण 670 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2024 आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी संबंधित संकेतस्थळावर जाऊन आणि सर्व माहिती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
शैक्षणिक पात्रता
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब या पदासाठी अर्ज करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वय 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट आहे.
अर्ज करण्यासाठी शुल्क
अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 1000 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग उमेदवारांकडून 900 रुपये शुल्क आकारले जाईल.
सविस्तर माहिती या लिंकवर जाऊन पहावी
https://swcd.maharashtra.gov.in/