लाल रंगाच्या भाज्यांमध्ये आहेत पौष्टिक तत्व

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । हिरव्या भाज्यांच्या सेवनाने होणारे फायदे आपण नेहमीच ऐकतो. परंतु लाल रंगाच्या भाज्यांमध्ये देखील शरीराला पौष्टिक असे अनेक गुणधर्म आढळून येतात . भाजीचा रंग जेव्हडा जर्द तितकी ती पौष्टिक तत्वांनी भरलेली असते. लाल भाज्यांमध्ये लाइकोपीन, एंथोक्यानिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात . ज्यामुळे हृदयाच्या आणि प्रोस्टेट ग्रंथींच्या कॅन्सर पासून सुरक्षा मिळते. चला तर मग जाणून घेऊयात या भाज्यांविषयी …

१. बिट : बीटमध्ये पोटैशियम, फाइबर, फॉलेट, विटामिन सी आणि नाइट्रेट भरपूर प्रमाणात आढळून येते. सलाडमध्ये किंवा ज्यूस करून घेतल्याने ब्लड प्रेशर, ब्लड फ्लो आणि इम्यूनिटी सिस्टम चांगली होते .

२. टोमॅटो : टोमॅटोमध्ये लाइकोपीन, विटामिन सी आणि पोटैशियम मोठ्या प्रमाणावर असते . टोमॅटोच्या सेवनाने प्रोस्टेट कैंसर, एसोफेगस कॅन्सर आणि कोलोन कॅन्सर पासून सुरक्षित राहता येते .

३. गाजर : गाजरामध्ये पोटैशियम, फॉलेट, जिंक, फास्फोरस, लाइकोपिन, मैगनीज, कॉपर, आयरन, कैल्शियम आणि अनेक प्रकारचे विटामिन आढळून येतात .

४. डाळिंब : डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर फाइबर, प्रोटीन, विटामिन सी, विटामिन के, फॉलेट आणि पोटैशियम असते. जुनाट खोकला, सर्दीसाठी डाळिंबाचे दाणे खावेत .

५. कांदा : कांद्यामध्ये ऑर्गेनोसल्फर असते . कांद्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम चांगली राहते . कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते .

Leave a Comment