Wednesday, October 5, 2022

Buy now

Credit Card : 1 जुलैपासून RBI बदलणार क्रेडिट कार्डचे नियम; आता ग्राहकांना मिळणार ‘हे’ विशेष अधिकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । RBI आता क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. हे नवीन नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. या नवीन नियमांमुळे आता ग्राहकांना जास्त अधिकार मिळणार आहेत. (Credit Card)

या नवीन नियमांतर्गत आता कोणतीही कंपनी अथवा बँकेला आता डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जारी करण्यापूर्वी ग्राहकांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी देखील ग्राहकांची परवानगी मागावी लागणार आहे. जर बँका यावेळी ग्राहकांची परवानगी न घेता क्रेडिट अथवा डेबिट कार्ड जारी करत असेल किंवा अपग्रेड करत असेल तर त्यांना ग्राहकांकडून शुल्क घेण्याचा अधिकार नसेल.

नक्की कोणते नियम बदलण्यात आले आहेत? (Credit Card)
1) जर यानंतरही ग्राहकांकडून शुल्क वसूल केले जात असेल तर ग्राहकांना संबंधित कंपनी किंवा बँकेकडून भरपाई मागण्याचा अधिकार असेल. तसेच, या भरपाईची रक्कम ही बँकेने लावलेल्या शुल्काच्या दुप्पट असेल.

2) क्रेडिट कार्ड बंद केलेल्या ग्राहकांनाही RBI ने मोठा दिलासा दिला आहे. या नवीन नियमानुसार, कंपनी किंवा बँकेला ग्राहकांकडून कार्ड बंद करण्यासाठी आलेली रिक्‍वेस्‍ट 7 दिवसांत पूर्ण करावी लागेल. जर तसे केले गेले नाही तर संबंधित कंपनी किंवा बँकेकडून खाते बंद होईपर्यंत दररोज 500 रुपये दंड आकारला जाईल. मात्र यावेळी कोणतीही थकबाकी नसावी याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.

3) जर एखाद्या कार्डचा ग्राहकांकडे पोहोचण्यापूर्वीच वापर झाला असेल तर त्याद्वारे झालेल्या नुकसानीची जबाबदारी ही संबंधित बँकेची अथवा कंपनीची असेल. या शिवाय TRAI च्या नियमांचे पालन करत बँकेच्या प्रतिनिधिने ग्राहकांना सकाळी 10 ते संध्याकाळी 7 यादरम्यानच कॉल करावा. (Credit Card)

4) याबोबरच एखादे कार्ड इश्‍यू आणि एक्टिवेट करण्यासाठी कंपनी अथवा बँकेला ओटीपीची मदत घ्यावी लागेल. जर ग्राहकाकडून 30 दिवसांच्या आत ओटीपी द्वारे कार्ड एक्टिवेट केले गेले नाही तर ते कोणत्याही शुल्काशिवाय बंद केले जावे.

5) जर एखाद्या ग्राहकाने एक वर्ष कार्डचा वापर केला नाही तर त्याला एक नोटीस पाठवून ते कार्ड बंद केले जावे. यादरम्यान बँकेला ग्राहकाला सर्व शुल्क आणि व्याजाची माहिती दयावी एका लेटर द्वारे द्यावी लागेल. जे कंपनी अथवा बँकेने ग्राहकाची विंनती फेटाळली तर त्याला लिखित स्वरूपात त्यामागील कारण द्यावे लागेल.