दमदार बॅटरी अन् 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बाजारात सध्या नवनवीन स्मार्टफोन (smartphone) येत आहेत. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेत मोबाईल उत्पादक कंपन्या अपडेटेड फीचर्सचे स्मार्टफोन बाजारात आणत असतात. आता चायनीज स्मार्टफोन (smartphone) उत्पादक कंपनी शाओमीने रेडमी 12C हा नवीन स्मार्टफोन चीनच्या बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन (smartphone) लवकरच भारतीय बाजारातदेखील लॉंच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये खास फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ग्राहकांना दमदार बॅटरी आणि 50MP चा कॅमेरा मिळणार आहे.

काय आहे फीचर्स ?
शाओमीने चीनमधील मोबाईल मार्केटमध्ये रेडमी 12C हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. लवकरच रेडमी 12C सीरिज भारतात लाँच होणार आहे. हा फोन ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीत असणार आहे. या फोनची (smartphone) प्रारंभिक किंमत 699 चायनीज युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 8385 रुपये असणार आहे. या फोनमध्ये 6.71 इंच HD+ डिस्प्ले, 50 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5000 mAh बॅटरी असे खास फीचर्स आहेत. शाओमीने रेडमी 12C सीरिज तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. या लेटेस्ट फोनचा बेस व्हेरियंट 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजचा आहे. या व्हेरियंटची किंमत 699 चायनीज युआन म्हणजेच सुमारे 8385 रुपये आहे. या सीरिजमधला दुसरा व्हेरियंट 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा आहे. या मॉडेलसाठी युजर्सला 799 चायनीज युआन म्हणजेच सुमारे 9585 रुपये खर्च करावे लागणार आहे.

शाओमी कंपनीने रेडमी 12 C या नव्या स्मार्टफोनच्या (smartphone) मागील बाजूस नॉन-स्लीप टेक्चर दिलं आहे. यात डायगोनल स्ट्रिप आहे. सिक्युरिटीसाठी या फोनच्या मागीलबाजूनस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्सचा विचार करता, या नवीन स्मार्टफोनमध्ये एक मायक्रो युएसबी पोर्ट,3.5mm चा हेडफोन जॅक, 4G नेटवर्क आणि एक मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. रेडमी 12C सीरिजमध्ये युजर्ससाठी 50मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल होणार आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती