Redmi Note 12 5G । रेडमी कंपनी बजेटमध्ये उत्तम स्मार्टफोन्स देण्यासाठी खुप प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. रेडमी नोट 12 5 जी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. हा स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. म्हणूनच हा फोन घेण्यास तुम्हाला खिशाला जास्त ताण द्यावा लागणार नाही.
रेडमी नोट 12 5G ही सिरीज भारतात जानेवारी 2023 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. या सिरीज मध्ये रेडमी नोट 12 प्रो 5जी आणि रेडमी नोट 12 प्लस 5जी यांचा देखील समावेश आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि एम आय डॉट कॉम द्वारे तुम्हाला परवडणाऱ्या कमीत कमी किमतीत हा हँडसेट तुम्ही खरेदी करू शकता. रेडमी नोट 12 5जी लॉन्च किंमतीपेक्षा 5 ते 6 महिन्यानंतर कमी किमतीत खरेदी करता येईल. त्याच्या किमतीत 1000 रुपयांची कपात सुद्धा करण्यात आली आहे. रेडमी नोट 12 5जी बेस 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरीएंट साठी फक्त 17,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पण, 16,999 रुपयांच्या किमतीसह हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.
यासोबतच, अनेक बॅंकेचे ऑफर्स ही यावर सुरू आहेत. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड वरून पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅक सोबतच, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वरून नॉन ईएमआय पेमेंट केल्यावर 2 हजार रुपयांची सूट देखील मिळणार आहे. तसेच, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड नॉन ईएमआय वर पर्यायसह पेमेंट केल्यास सुद्धा 2 हजार रुपयांची सूट आहे. त्याबरोबरच तुमच्याकडे जुना फोन एक्सचेंज करण्यासाठी उपलब्ध असेल तर, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला संपूर्ण तुमच्या मनाला पटणार अश्या किंमतीची सवलत सुद्धा मिळेल. यासाठी तुमचा जुना फोन उत्तम स्थितीत असणे फार गरजेचे आहे.
रेडमी नोट 12 5जी च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास फोन मध्ये 6.67 इंच लांबीचा फुल एचडी + डिस्प्ले सुद्धा दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 12- आधारित एमआययुआय 13 वर चालतो. हे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 एसओसी द्वारे संचालित केले आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 एमपीचा आहे आणि 13 एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय फोन मध्ये 5000 एमएएच बॅटरी सुद्धा उपलब्ध आहे. जी 33डब्ल्यू फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते.