मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची आज वार्षिक बैठक म्हणजेच, एजीएम सुरु आहे. मुकेश अंबानी यांनी या बैठकीत मोठ्या घोषणा केल्या आहेत. “5G नेटवर्कसाठी आवश्यक परवाने देण्यास सुरूवात झाल्यानंतर पुढील वर्षी भारतामध्ये हे तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी जिओ सज्ज आहे,” असं अंबानी म्हणाले. इतकंच नाही तर हे तंत्रज्ञान आपण जगामध्ये निर्यात करण्याक्षम असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा दाखला देत जिओ याच दिशेने वाटचाल करत असल्याचे आणि संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा केवळ वापरच नाही तर जगाला डिजिटल तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य ठेवल्याचंही यावेळी नमूद केलं.
गूगल जियोमध्ये 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स एजीएममध्ये बोलताना सांगितले की, ‘संकटाच्या वेळी अनेक मोठ्या संधी येतात. RIL चं मार्केट कॅप 150 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेलं आहे. याचसोबत मुकेश अंबानी यांनी गूगलसोबत करार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, गूगल जियोमध्ये 7.7 टक्क्यांची भागीदारी करणार आहे. तसेच त्यांनी सांगितलं की, गूगल जियोमध्ये 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीवर आता कसलंही कर्ज नाही
मुकेस अंबानी बोलताना म्हणाले की, त्यांना गर्व आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीवर आता कसलंही कर्ज नाही. तसेच कंपनीने मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त होण्याचं जे लक्ष्य ठेवलं होतं, ते वेळे आधीच पूर्ण केलं आहे. तसेच 150 अब्ज डॉलर्स ची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील पहिली कंपनी असल्याचंही मुकेश अंबानी यांनी सांगितलं.
रिलायन्स सर्वाधिक जीएसटी देणारी कंपनी
रिलायन्सने आतापर्यंत २ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमतीची निर्यात केली आहे. तसंच रिलायन्स ही सर्वाधिक जीएसटीची रक्कम भरणारी (६९ हजार ३७२ कोटी रूपये) कंपनी असल्याचंही अंबानींनी सांगितलं. सेमी कंडक्टर इंडस्ट्रिजमधील दिग्गज इंटेल आणि क्वालकॉम डिजिटल हे इकोसिस्टमचे हृदय मानले जातात. रिलायन्स भारत आणि भारतीयांसाठी नव्या उत्पादनांना विकसित करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
JioTV+ लाँच
आकाश अंबानीने एजीएममध्ये जियो टीव्ही+ सादर करत सांगितलं की, जियो टीव्ही+ मध्ये जगभरातील 12 अग्रणी ओटीटी कंपन्यांचा कन्टेंट मिळणार आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिज्नी प्लस हॉटस्टार, वूट, के साथ साथ जी5, सोनी लिव, जियो सिनेमा, जियो सावन आणि यूटयूब यांसारख्या कंपन्यांचा समावेश असणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.