नवी दिल्ली | देशातील सहा कोटी ईपीएफओ सबस्क्रायबरना मोठा दिलासा मिळाला आहे. वित्तीय वर्ष 2020-21 साठी पीएफ व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टिज (CBT) च्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
वित्तीय वर्ष 2020-21 करिता पीएफवरील व्याजदर घटतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु बोर्डाने वित्तीय वर्ष 2020-21 साठी व्याजदर 8.5% स्थिर ठेवले आहेत. वित्तीय वर्ष 2020 मध्ये ईपीएफओच्या कमाईमध्ये खूप कमी आली होती. गेल्या सात वर्षांमध्ये पीएफ’वर मिळणाऱ्या व्याजदरात सर्वात जास्त घट करून 8.5% केला होता. त्यामुळे याहीवर्षी व्याजदरांमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण या निर्णयामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
वित्तीय वर्ष 2020 मध्ये पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळाले. हे व्याजदर गेल्या सात वर्षांमध्ये सर्वात कमी होते. यापूर्वी 2013 च्या वित्तीय वर्षामध्ये पीएफवर व्याजदर हे 8.5% होते. देशभरामध्ये ईपीएफ’चे सहा कोटी सबस्क्राईब आहेत. सन 2020 मध्ये कोट्यावधी लोकांना केवायसी मध्ये झालेल्या गडबडीमुळे व्याज मिळण्यास विलंब झाला होता. त्यावेळीही मोठी चर्चा या संदर्भामध्ये झाली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.