राज्यातील धार्मिकस्थळे सुरु होणार ? माहीम दर्गा व्यवस्थापनाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची घटती संख्या लक्षात घेता महविकासआघाडी सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हिटी ५ टक्के असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच जवळपास बहुतेक सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत मात्र धार्मिक स्थळे अद्याप सुरु करण्यात आलेली नाहीत. याच पार्शवभूमीवर मुंबईच्या मखदूम शाह बाबा दर्गाच्या व्यवस्थापनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दर्गा सहित इतर धार्मिक स्थळे उघडण्याबाबत परवानगी मागण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे.

याबाबत मिळाली अधिक माहिती अशी की, मुंबईच्या मखदूम शाह बाबा दर्गा व्यवस्थापन (माहीम दर्गा) यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दर्गा तसेच इतर धार्मिक स्थळे ५०% क्षमतेसह पुन्हा सुरु करण्याबाबत पत्र लिहले आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाने हे पत्र आपत्ती व्यवस्थापन व नगरविकास विभागाला कारवाईसाठी पत्र पाठवेल असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील धार्मिक स्थळे देखील सुरु होणार की नाही ? याबाबत निर्णय येण्याची शक्यता वततावली जात आहे.

राज्यातील कोरोना आकडेवारी

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात सोमवारी १०,२१९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५४ मृत्यू झाले आहेत.राज्यात सध्या १,७४,३२० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात २१,०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५५,६४,३४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्के, तर मृत्युदर १.७२ टक्के आहे. राज्यात १२,४७,०३३ व्यक्ती होमक्वारंटाइन तर ६,२३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

 

Leave a Comment