कैऱ्या तोडल्याच्या रागातून मुलाच्या अंगावर लघुशंका करत मारहाण

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भडगाव तालुक्यातील अंजनविहिरे या ठिकाणी एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने झाडावरील कैऱ्या तोडल्याच्या रागातून त्याला झाडाला बांधून त्याला बेदम मारहाण केली आहे. आणि एवढेच नाहीतर त्याच्या अंगावर लघुशंका करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या मुलाकडून करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण
अंजनविहिरे येथील एका शेतात कैर्‍या तोडल्याच्या कारणावरून शेतमालकासह रखवालदाराने एका अल्पवयीन मुलाला दोन तास झाडाला बांधून त्याला जबर मारहाण केली आहे. तसेच या मुलाच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ काढून तो व्हॉट्सअपवर व्हायरल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत शेतमालक गोपी उर्फ विवेक रवींद्र पाटील आणि रखवालदार प्रवीण पावर्‍या यांना अटक केली आहे.पीडित मुलगा हा 12 वीच्या शिक्षणासाठी अंजनविहिरे येथे मामाकडे आला होता.

5 जून रोजी तो त्याच्या गिरड गावातून आजीची औषधे घेऊन परत जात असताना त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैर्‍या तोडल्या.झाडाच्या कैऱ्या तोडल्यानंतर रखवालदाराने त्याला जाब विचारात हा प्रकार शेताच्या मालकाला सांगितला. यानंतर शेतमालकाने आणि रखवालदाराने मुलाला मारहाण करीत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले आणि त्याला मारहाण केलेल्याचा व्हिडीओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला.यानंतर या मुलाने घडलेला सर्व प्रकार मामा आणि आजीला सांगितला. यानंतर दुसर्‍या दिवशी 6 जूनला याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रासिटी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

You might also like