रेमडेसीविर इंजेक्शन झाले स्वस्त; जाणून घ्या काय आहे नवीन किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | करणाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमदेसिविर इंजेक्शन सध्या प्रचंड प्रमाणात मागणी असलेले आहे. परंतु औषधाचा असलेला तुटवडा आणि मागणी मधील तफावत यामुळे या इंजेक्शनवर मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. रेमदेसीवीर इंजेक्शनचे उत्पादन घेणाऱ्या देशातील प्रमुख कंपन्यांनी इंजेक्शनच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मंसुख मंडविया यांनी आपल्या ट्विटरवर कंपन्यांच्या 100 एमजी औषधाचे नवीन दर टाकले आहेत. किती आहेत हे नवीन दर जाणून घेऊ.

कॅडीला हेल्थकेअर लिमिटेड कंपनी रेमदेसीवीर इंजेक्शन REDMAC या नावाने विकते. ज्याची किंमत आधी 2800 रुपये होती. ती आता 899 रुपये करण्यात आली आहे. सिंगेन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचे रेमदेसीवीर इंजेक्शन Remvin या नावाने ओळखले जाते. 3950 रुपये किंमत असलेले हे औषध आता 2450 रुपयांना उपलब्ध असणार आहे. डॉक्टर रेड्डीज लॅबरोटरीमार्फत हे औषध REDYX म्हणून दिले जाते. त्याची किंमत आधी 5400 रुपये होती ती सद्ध्या 2700 रुपये करण्यात आली आहे. सिप्ला लिमिटेड कंपनी हे CIPREMI नावाने रेमदेसिविर इंजेक्शन देते. या कंपनीचे आधीचे दर 4000 रुपये होते. ते आता 3000 रुपये केले आहेत.

सरकारच्या गाईडलाईन्स अनुसार, हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला दिले जाते. वरीलपैकी सिप्ला कंपनी ही आपले औषध रूग्णालयात पोहोच करते. कंपनीची www.cipla.com या अधिकृत वेबसाईटवर याची माहिती आहे. शिवाय कंपनीच्या मदतीसाठी 8657311088 हेल्पलाईन आणि आहे यावर माहिती मिळू शकणार आहे. डॉक्टर रेड्डीज यांच्या readytofightcovid.in या अधिकृत वेबसाईटवर इंजेक्शन उपलब्ध हॉस्पिटल आणि फार्मसीची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच,1800266708 ही हेल्पलाइनही त्यांनी जारी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment