तोंडाला चव येण्यासाठी करा ‘हे’ उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जेवणाची चव लागत नाही अश्या तक्रारी अनेक वेळा ऐकायला मिळतात. स्वाद ग्रंथी चांगल्या रीतीने काम करत नसल्याने हा त्रास होण्यास सुरुवात होते. गंध ग्रंथी सुद्धा काम करत नाहीत त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा फरक हा जिभेवर पडत नाही. काही लोकांना मधुमेह, हृदयाचा , बीपीचा त्रास असल्याने त्या लोकांना सतत कोणते ना कोणते औषध सुरु असतात. त्यामुळे तोंडाची चव निघून जाते. तोंडाची चव न येण्यासाठी हि औषधें सुद्धा कारणीभूत आहेत.

भूक लागल्यानंतर लगेच जेवण केल्यास तोंडाला चव चांगली लागते. जबरदस्तीने कोणी जेवणाचा प्रयत्न करत असेल तर त्या जेवणाचा काहीही फायदा होत नाही. जेवणात नेहमी एकच गोष्ट असेल तर त्याची चव तोंडाला अजिबात येत नाही. त्यामुळे जेवणात विविधता असली पाहिजे. दररोज नवीन काहीतरी जेवणात असल्याने चव कायम राहते. सतत धूम्रपान करणे वाईट गोष्ट आहे. त्यामुळे सुद्धा स्वाद ग्रंथी या काम करत नाहीत.

दररोज घाईघाईत जेवण केल्यास शरीराला अपायकारक असते. अनेकांना सवय असते टीव्ही पाहत जेवण करणे पण हि सवय सगळ्यात वाईट आहे. पूर्ण जेवण करत असतातं आपले लक्ष हे जेवणावर नसते तर ते जास्त टीव्ही पाहण्यात असते . त्यामुळे ना कोणत्या पदार्थंची चव कळत नाही. कि स्वाद लक्षात येत नाही. जेवणात लाल रंगाचा हा समावेश असल्याने तोंडाला चांगली चव येते आणि जेवण करण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे मसालेदार पदार्थांचा समावेश असला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’