आर्थिक नियोजनासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होईल भरपूर फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपले आर्थिक भविष्य अजून उज्वल करायचे असेल तर आपल्याला पैशांची अधिकाधिक गुंतवणूक करणं गरजेचं आहे. परंतु कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता गुंतवणूक न केल्यास आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जाऊ लागू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही आर्थिक उद्दिष्टासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे काही नियम आहेत जे नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत.

1) बचत करून खर्च करा-

सामान्यतः, घरखर्च पूर्ण केल्यानंतर उरलेल्या पैशांची आपण गुंतवणूक करतो. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्या दिवशी आपल्या घरात पैसे येतील त्या दिवशी सर्वात त्या पैशातील काही रक्कम बचतीसाठी काढून घ्या. आता उरलेल्या पैशातून घरखर्च चालवा. हेही लक्षात ठेवा की ज्या दिवसापासून तुम्ही कमाई करायला सुरुवात केली, त्याच दिवसापासून बचत करायला सुरुवात केली पाहिजे. आणि आपण नियमितपणे बचत करावी. तसेच काळाबरोबर बचतीचा वाटाही वाढला पाहिजे.

2) प्रथम जीवन सुरक्षित करा-

गुंतवणुकीची पहिली पायरी स्वतःचे जीवन सुरक्षित बनवण्यापासून सुरू होते. जीवन सुरक्षित करणे म्हणजे भविष्यातील आर्थिक सुरक्षा. तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १५ पट लाइफ कव्हर असले पाहिजे. जेणेकरून घरातील कमावते सदस्य नसताना कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

3) सेवानिवृत्ती नियोजन-

आपण तरुण असतानाच वृद्धापकाळाची योजना आखली तर भविष्यात आर्थिक चणचण भासणार नाही. सध्याची वाढती महागाई आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पेन्शन योजनेत गुंतवणूक करावी. आजच्या उत्पन्नाच्या तुलनेत तुम्ही भविष्यासाठी किमान २५ पट बचत केली पाहिजे.

4) आपत्कालीन निधी-

कोणत्याही गुंतवणूकदाराकडे आपत्कालीन निधी असणे आवश्यक आहे. कारण, आपत्कालीन निधीच्या मदतीने जीवनात अचानक आलेल्या आर्थिक संकटाचा सामना केला जाऊ शकतो. आपत्कालीन निधीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे इतर योजनांसाठी केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते . आपत्कालीन निधी किमान सहा महिन्यांच्या खर्चाएवढा असावा.

 

Leave a Comment