रेणू शर्मा मला वारंवार मेसेज करुन संबंध ठेवण्यासाठी विचारायची; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाविकास आघाडी सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणार्‍या रेणु शर्मा या महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. रेणू शर्मा मला वारंवार मेसेज करुन संबंध ठेवण्यासाठी विचारायची असा गौप्यस्फोटही हेगडे यांनी केला आहे. कृष्णा हेगडे हे माजी आमदार आहेत. तसेच मुंबई भाजपचे हगडे हे उपाध्यक्ष आहेत.

रेणु शर्मा हनिट्रेप रचणार्‍यांतील आहे असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे. रेणु शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप पाहून मला धक्का बसला. यानंतर याबाबतचा आपला अनुभव मुंबई पोलिसांना सांगण्याचा आपण निर्णय घेतला असे हेगडे यांनी सांगितले.

रेणु शर्मा हिने मला शेवटचा मेसेज 06 जानेवारी 2021 ला केला होता. मात्र मी मेसेजला उत्तर दिलं नाही. फ्रेंडशीप किंवा संबंधात राहू यासाठी ती महिला प्रयत्नशील होती, पण मी तिला रिस्पॉन्स दिला नाही. 4 ते 5 वर्ष तिचे कॉल आणि मेसेज आले परंतु मी तिला एंटरटेन केलं नाही. मी तिला दूर ठेवले. 06 जानेवारी आणि 07 जानेवारीला तिने मला मेसेज केला. आप मुझे भूल गये क्या? मात्र थम्ब इमोजी पाठवण्याव्यतिरिक्त मी काही मेसेज केला नाही अशी माहिती हेगडे यांनी दिली आहे.

रेणु शर्मा या महिलेची भेट कुठे झालीय का? ती भेट कोणाच्या मार्फत झाली याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र रेणु यांची कोणत्या तरी कार्यक्रमात भेट झाली होती. त्यानंतर रेणु यांनी मला फेसबुकवर फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवली. फेसबुक मेसेंजरवरही त्यांनी मला अनेकदा मेसेज पाठवले. त्यानंतर तिने माझा मोबाईल नंबर मिळवला. मात्र मी तिझ्या कोणत्याही मागणीला बळी पडलो नाही असं हेगडे यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like