हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे RBI कडून शुक्रवारी पुन्हा एकदा रेपो दर (Repo Rate) वाढवण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी RBI ने 50 बेसिस पॉइंट्स किंवा 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. देशातील चलनवाढ ही RBI ने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा सातत्याने वाढते आहे. देशातील किरकोळ महागाईचा दर देखील सध्या 7 टक्क्यांवर आला आहे. या वर्षात आतापर्यंत 4 वेळा रेपो दरात वाढ केली गेली आहे.
या दर वाढीचा परिणाम आता सर्वसामान्यांवर होणार आहे, कारण आता आरबीआय बँकांना जास्त व्याजदराने कर्ज देईल. ज्यामुळे हा भार बँकांकडून आपल्या ग्राहकांवर टाकला जाईल. ज्याच्या परिणामी होम ,पर्सनल आणि कार लोन वरील कर्जांच्या व्याजदरा वाढ होईल. मात्र, रेपो दरात (Repo Rate) वाढ झाल्याचा एक फायदा देखील असणार आहे. जो बँकेमध्ये FD करणाऱ्या लोकांना मिळणार आहे.
FD वरील व्याजदर बदलणार
या दर वाढीचा परिणाम बँकांच्या FD वरही झाला आहे. कारण कर्जाच्या व्याजदराबरोबरच बँकांकडून एफडीचे व्याजदरही वाढवले जातात. याआधीही ऑगस्टमध्ये रेपो दर (Repo Rate) वाढल्यानंतर जवळपास सर्व बँकांकडून आपल्या एफडी वरील व्याजदरात वाढ केली गेली. त्यामुळे आता पुन्हा एकदा रेपो दरात (Repo Rate) वाढ झाल्याने एफडीवरील व्याजदर आणखी वाढतील.
कोणाला फायदा मिळणार ???
मात्र हे लक्षात घ्या कि, या दर वाढीचा फायदा सर्वच ग्राहकांना होणार नाही. कारण ज्या ग्राहकांनी व्याजदर वाढण्यापूर्वी एफडी केली असेल त्यांना बँकेकडून दर वाढीचा लाभ दिला जात नाही. यामागील कारण असे कि, एफडीचे व्याजदर हे त्याच्या मुदतपूर्तीपर्यंतच निश्चित केले जातात. त्यामुळे त्याचा फायदा फक्त नवीन एफडी किंवा एफडीचे रिन्यूअलसाठीच असेल.
व्याज दर लगेच वाढणार का ???
रेपो दरात (Repo Rate) वाढ झाल्यानंतर बँका FD वरील व्याजदर लगेच वाढवत नाहीत. ते हळूहळू वाढवले जातात. याशिवाय, सर्व कालावधीच्या FD वरील व्याजदर वाढवले जात नाहीत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/FS_Overview.aspx?fn=2752
हे पण वाचा :
Sukanya Samriddhi Yojana म्हणजे काय ??? त्यावरील व्याजदर जाणून घ्या
RBI च्या रेपो वाढीचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होणार ते समजून घ्या
RBI कडून रेपो दरात सलग चौथ्यांदा वाढ, आता कर्जे आणखी महागणार
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाली वाढ, पाहा ताजे दर
Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत