हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | तुम्ही जुन्या फोनला कंटाळला असाल आणि नवीन फोन घेण्याची इच्छा असेल तर, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध ई-कॉमर्स वेबसाइटवर फोनसाठी मोठ्या डिस्काउंट प्रमाणात उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, रिलायन्स, वन प्लस, आणि रियल मी सारख्या मोठ्या – मोठ्या कंपन्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेल आणि डिस्काउंट देत आहेत. Republic Day Sale
‘हॅलो महाराष्ट्र’ तुमच्यासाठी घेऊन येत आहे असेच दहा स्मार्टफोन. जे खरोखरच ‘स्मार्टफोन ‘ या नावाला साजेसे आहेत. सोबतच भरघोस डिस्काउंट वरती सध्या मिळत आहेत. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन वरती सध्या ‘बायर सेल’ सुरू आहे. फ्लिपकार्टच्या सेलचा आज शेवटचा दिवस आहे
1) iPhone 12 मिनि:
Iphone 12 गेल्या वर्षी रिलीज झाला. आणि त्याला प्रतिसादही खूप मिळाला. ॲमेझॉनवरती iPhone 12 मिनी साठी दहा हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मूळ किंमत एकूण 60990 रुपये असलेला हा फोन 59990 रुपयामध्ये मिळत आहे.
2) OnePlus 8T
OnePlus च्या स्मार्टफोनला वापरकर्त्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद आणि पसंती मिळत आहे. OnePlus ने 8T हा त्यांचा स्मार्टफोन बाजारात आणला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. ॲमेझॉनवरती डिस्काउंट सहित हा फोन 40499 रुपयांमध्ये मिळत आहे. Republic Day Sale
3) सॅमसंग गॅलेक्सी 51
या स्मार्ट फोन वरती ॲमेझॉन 8000 रुपये इतका डिस्काउंट देत असून, 6 जीबीचा फोन 14999 मध्ये मिळू शकेल.
4) realme Narzo 20pro
तुम्ही बजेटमध्ये स्मार्टफोन शोधत असाल. आणि बजेट सोबत तुम्हाला क्वालिटी चांगली हवी असेल तर, तुमच्यासाठी realmi ने चांगले स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. त्यामधील चांगला एक म्हणजे ‘रियल मी 20 प्रो’ यावरती फ्लिपकार्ट 2000 डिस्काउंट देत असून, हा फोन 13999 मध्ये सध्या मिळू शकेल सोबतच 13450 पर्यंत एक्सचेंजची किंमतही मिळू शकेल.
5) Poco x3
हा फोन फ्लिपकार्टवरती सगळ्यात कमी किमतीमध्ये मिळत आहे. ‘बिग सेविंग डेज’ मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेला हा फोन 14999 मध्ये मिळत आहे.
6) Apple iPhone 11
Apple iPhone 11 हा फोन बाजारात येऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. तरीही या फोनची क्रेझ अजून कमी झालेली नाही. फ्लिपकार्टवरती हा फोन 48999 मध्ये मिळत आहे. सोबतच 16500 रुपयांपर्यंत फ्लिपकार्टवर एक्सचेंज किंमत आणि अमेझॉनवरती 12499 रुपयांपर्यंत मिळत आहे. Republic Day Sale
7) iPhone 11 Pro
फ्लिपकार्टवरती हा स्मार्टफोन 79999 रुपयांमध्ये मिळत आहे. या फोनची मूळ किंमत 99900 रुपये इतकी होती. 64 जीबी इंटरनल मेमरी असलेला हा फोन एक्सचेंज सोबत 16500 रुपयांमध्ये मिळत आहे. सोबतच HDFC कार्डवाल्यांना 10 टक्के जास्तीचा कॅशबॅक मिळणार आहे.
8) iPhone XR
जर तुम्हाला आयफोन घ्यावा अशी इच्छा असेल, आणि तुमचे बजेट 40 हजार पेक्षा कमी असेल. तर तुमच्यासाठी हा फोन नक्कीच आनंद घेऊन येणार आहे. या फोनची किंमत 40 हजार पेक्षा कमी आहे. सोबतच एक्सचेंजमध्ये 16500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.
9) iPhone SE
64जीबी मेमरी असलेला हा फोन फ्लिपकार्ट वरती 31999 रुपयांमध्ये मिळत आहे.
10) Samsung galaxy 520+
8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी असलेला हा फोन फ्लिपकार्ट वरती 44499 रुपयांमध्ये मिळत आहे. एक्सचेंजवरती 16500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. तसेच HDFC कार्ड वाल्यांना 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे.