औरंगाबाद | औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ झाली आजे. इम्तियाज जलील यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला आहे. तसेच जलील यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थी सेनेने केलेल्या तक्रारीत जलील यांच्यासोबतच अभियंता अशोक येरेकर यांच्यासुद्धा नावाचा उल्लेख आहे.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहे आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील रस्त्यावरून काल (27 जानेवारी) काही तरुण आणि इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यांनतर इम्तियाज जलील यांनी तरुणांना दमबाजी केल्याचा आरोप तरुणांनी केला होता. तर दुसरीकडे तर तरुणांनाकडून इम्तियाज जलील यांना शिवीगाळ झाल्याचे जलील समर्थकांनी म्हटलं होतं. विद्यार्थी सेनेचे तरुण आणि इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
गुरुवारी जलील समर्थक आणि काही तरुण यांच्यामध्ये बाचाबाची झाल्यानंतर जलील यांनी काही तरुणांना हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात तशी तक्रारसुद्धा दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’