कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्होल्वर पळवून नेण्याचे धाडस गुन्हेगारी प्रवूत्तीच्या समाजकंटकाकडून झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील फोफावलेल्या अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली. या मागणीचे निवेदन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले.
व्हीओ-1- कोल्हापूर शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका, जुगार, वेश्या व्यवसाय, मॅच बेटिंग, गांजा विक्री खुलेआम सुरु आहे. याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी वेळोवेळी शिवसेनेकडून केली जाते. पण, पोलीस प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचे अवैद्य धंदेवाईकांशी असलेले लागेबंध यामुळे या अवैद्य धंद्यांना लगाम बसण्याऐवजी त्यास पाठबळ मिळत जावून, शहरास अवैद्य धंद्याची कीड लागली आहे. यामध्ये शहरातील तरुण वर्गास गुंतवून त्यांच्या आयुष्याशी खेळण्याची प्रकार कुख्यात अवैद्य धंदेवाईकांकडून होत आहे. कुख्यात मटकाबुकीच्या अड्यावर छापा टाकण्याऱ्या महिला प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी दाखविलेल्या धाडसी कारवाई अभिनंदनास्पद आहे. पण, पोलीस प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांची अवैध्य धंदेवाईकांशी असणारे लागेबंद अशा कारवाईस मारक ठरत आहेत.
गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात मॅच बेटिंग अडड्यावर छापा टाकण्यात आला. परंतु, त्यानंतर झालेल्या जुजबी कारवाईने खुलेआम मॅच बेटिंग करण्याचे लायसन्स मिळाल्यासारखे हा धंदा फोफावला. यामध्ये युवा वर्गास पैशाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढण्याचे काम करण्यात येत आहे. प्रसंगी त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेवून घरातील सोने दागिने विकण्या इतपत युवा वर्गास प्रवूत्त करून त्यांना लुटले जाते. यामध्ये शहरात गांजा विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. कॉलेज, बाग बगीचे निर्जनस्थळी असे गांजा विक्री खुलेआम चालू आहे.
युवा पिढीस नशेच्या आहारी ढकलून त्यांना आयुष्यातून बरबाद करण्याचे, व्यसनाधीन करण्याचे काम चालू आहे. यासह कोल्हापूर शहरातील एका पोलीस ठाण्यासमोरच अवैद्य देह विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरु असल्याचे राजरोस पहायला मिळते. पण, त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन तत्परता दाखवीत नाही. त्यामुळे या परिसरात येणाऱ्या महिलांनाही अनेकवेळा नाहक त्रासास सामोरे जावे लागते. कोल्हापूर शहरात फोफावलेल्या या अवैद्य धंद्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. कोल्हापूर शहरातून अवैद्य धंदे हद्दपार करून त्यांना पोसणाऱ्या गुन्हेगारी प्रवूत्तीच्या लोकांचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याच्या मुळाशी जावून अवैद्य धंदे उखडून काढावेत, अशी मागणीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केली.