सांगली | श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या मिरज विभागातर्फे पारंपरिक शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात १०१ रक्तदात्यानी रक्तदानाचे कर्तव्य बजावले. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्यावतीने मिरज येथे शिवजयंतीचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे, भाजप नगरसेवक निरंजन आवटी आणि शिवसेनेचे मिरज शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे, स्थायी समितीच्या माजी सभापती संगीता हारगे, मिरज विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष शैलेश देशपांडे यांनी केले. रक्ताची टंचाई ओळखून अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक नितीन चौगुले, मिरज कार्यवाह विनायक माईणकर, सुमेध ठाणेकर, प्रशांत देसाई, जयदीप सदामते, बाळासाहेब विभुते, प्रसाद दरवंदर, किशोर झाम्बरे, विनायक कुरबेट्टी, उमेश हारगे, खरं कोळेकर, प्रशांत गायकवाड यांच्यासह युवा हिंदुस्थानचे सर्व सहकारी उपस्थित होते. रक्तदात्यांना सांगली शहर गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र सावंत्रे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. लस घेतलेल्याना पुढचे ६० दिवस रक्तदान करता येत नाही. महाराष्ट्रात पुढील ४ महिन्यात रक्ताचा तुटवडा भासू शकतो, हि गरज ओळखून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.