Monday, February 6, 2023

रेवणसिद्ध मंदिर इतिहासात पहिल्यांदाच राहणार बंद

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री रेवणसिद्ध देव मंदिर इतिहासात पहिल्यांदाच बंद करण्यात आले आहे. क्षेत्र रेवणसिद्ध येथे सोमवार, गुरुवार, अमावस्या या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. अवघा रेवणसिद्ध डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलतो. या पार्श्वभूमीवर प्रशासन, ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट, जंगम, पदाधिकारी यांच्या बैठकीत ३१ मार्चपर्यंत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

दक्षिण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या खानापूर तालुक्यातील रेवणसिध्द मंदिरात सोमवार, गुरुवार, अमावस्या या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. अवघा रेवणसिद्ध डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलतो. संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मधून भाविक रेवणसिध्द येथे येत असतात. परंतु सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर रेणावी येथे प्रशासन, ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट, जंगम, पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आले. मंदिरात नित्य पूजापाठ होणार असले तरी प्रशासनाच्या सूचनेनुसार ३१ मार्च पर्यंत मंदिर भाविकांना बंद करण्यात आले आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील  ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.

कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –

करोनामुळं सोने बाजारावर संक्रांत; ७५ टक्के मागणी घटली

करोनानं रस्त्यावर थुंकणं केलं महाग; भरावा लागणार १००० रुपये दंड

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी

राज्यातील मास्कच्या वाढत्या मागणीवर मंत्र्यांनी ‘असा’ काढला मार्ग