दक्षता! केवळ १ रुपयात थर्मल स्क्रिनिंगद्वारे करा तापाची चाचणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना व्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. हे पाहता भारतीय रेल्वेने स्थानकांवरील प्रवाशांसाठी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था केली आहे. रेल्वे प्रवासी फक्त १ रुपये शुल्क देऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे ताप तपासू शकतील. रेल्वे प्रशासनाने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रवाशांना ही सोय उपलब्ध करून दिली आहे.

मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांवर केवळ १ रुपयात हे क्लिनिक कार्यरत आहे. मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ही सेवा उपलब्ध आहे. या क्लिनिकमध्ये प्रवाशी तपासणी, रक्तदाब, ऑक्सिजन लेव्हल, कंसल्टेशन, प्रेसक्रिप्शन अशा सुविधा उपलब्ध आहेत. जर एखाद्या प्रवाशाला ताप जास्त असल्याचे आढळले तर त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जाईल.

काय आहे थर्मल स्कॅनर
थर्मल स्कॅनर एक उपकरण किंवा प्रणाली आहे ज्याद्वारे करोना व्हायरस किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त व्यक्ती ओळखली जाऊ शकते. थर्मल स्कॅनर एका इंफ्रारेड कॅमेर्‍यासारखे कार्य करते. या स्कॅनरमधून जाणा-या व्यक्तीच्या शरीरात असलेले व्हायरस इंफ्रारेड छायाचित्रांमध्ये दिसतात, जेव्हा विषाणूंची संख्या जास्त असते किंवा धोकादायक पातळीवर असते तेव्हा त्या व्यक्तीचे शरीराचे तापमान देखील वाढते. अशा स्थितीत थर्मल स्कॅनर माध्यमातून संसर्गग्रस्त व्यक्ती सहज ओळखली जाते.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment