औरंगाबाद | विविध धर्मगुरु, पुजारी, महंत यांनी प्रशासन आणि जनतेतील दुवा व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध धर्मगुरु तसेच धार्मिक स्थळांचे प्रमुख यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.
समाजात धर्मगुरूंना मानाचे स्थान आहे. आपण सांगितलेलं लोक ऐकतात. आपला जनतेत प्रभाव आहे. या प्रभावाचा वापर आपण जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी करावा. आपापली प्रार्थनास्थळे व त्या ठिकाणी येणारे भाविक श्रद्धाळू यांचे नियोजन तर आपण करालच, मात्र त्या सोबतच आपापल्या भागातील लोकांना सुचना करुन त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यासाठी प्रवृत करणे, लोकांनी स्वत:हून चाचण्या करुन घेणे यासाठी आपण आवाहन व प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी धर्मगुरूंना केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध धर्मगुरु तसेच धार्मिक स्थळांचे प्रमुख यांची बैठक आज संपन्न झाली यावेळी विविध धर्मगुरू पुजारी, महंत यांची उपस्थिती होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.