नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाने १७ ऑगस्ट रोजी NEET UG 2020 आणि JEE (main) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगर भाजप ६ राज्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्यासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. JEE (main) परीक्षा १-६ सप्टेंबर तर NEET UG 2020ची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिय गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत करोनाच्या संकटामुळे अनेक राज्यांमध्ये NEET आणि JEE परीक्षा घेणे शक्य नसून त्यापुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे फेरयाचिका करण्याची सूचना ममता बॅनर्जी यांनी सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांना केली होती. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सहभागी झाले होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी न्यायालयात जाण्याआधी पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे मांडण्याची सूचना केली होती. मात्र पंजाब, छत्तीसगढ, पुडुचेरी, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी बॅनर्जी यांचा न्यायालयीन पर्याय उचलून धरला.त्यानुसार आज ६ राज्यांनी परीक्षांच्या स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
[BREAKING] Review plea by 6 opposition ruled states filed in Supreme Court challenging the August 17 order dismissing petition seeking to postpone NEET-UG and JEE(Mains) exam amid the #COVID19 pandemic. #JEE_NEETcanWAIT#neetjeepostpone#SupremeCourt #ExamsInCovid pic.twitter.com/zVrGqvmf7O
— Bar and Bench (@barandbench) August 28, 2020
दरम्यान, NEET आणि JEE या परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यार्थी व पालकांचाच दबाव येत असल्याचा दावा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी स्पष्ट केले आहे. रमेश पोखरियाल यांनी याबातत बोलताना म्हटलं की, एनटीएच्या (NTA) संचालकांनी सांगितल्याप्रमाणे जेईईच्या 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी साडेसात विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाऊनलोड केलं आहे. तर नीटच्या 15.97 लाख विद्यार्थ्यांपैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र गेल्या 24 तासात डाऊनलोड केलं आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा व्हावी ही विद्यार्थांची इच्छा आहे, असं पोखरियाल यांनी म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.