कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे -बेंगलोर महामार्गावर तासवडे टोलनाक्याजवळ असलेल्या वहागाव- बेलवडे गावच्या हद्दीत दारूच्या नशेत असलेल्या चालकांच्या चुकीमुळे ॲपे रिक्षा पलटी झाली आहे. आज मंगळवार दिनांक 12 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सांगली येथून साताराकडे केक पाॅकीग करणारे तगड भरून असताना रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून रिक्षाने धडक दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली येथून सातारकडे निघालेली रिक्षा गाडी क्रमांक (एमएच -10 के 2625) वहागाव- बेलवडे गावच्या हद्दीत पलटी झाली. या रिक्षावरील चालक दारूच्या नशेत असल्याने त्याने रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठिमागून धडक दिली. धडक जोरदार दिल्याने रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे. सुदैवाने अपघात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला आहे. रिक्षाचालकाजवळ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे ओळखपत्र मिळून आले आहे. यावेळी रीक्षा रस्त्यावरुन नागरीकांच्या साह्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, मोहन मिसाळ, रमेश खुणे, चंद्रकांत जवळगेकर या सर्व मदत केली.