हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार असलेल्या Ricky Ponting ची तब्येत अचानक बिघडल्याने लोक चिंतेत पडले आहेत. हे लक्षात घ्या कि, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पाँटिंगची तब्येत पूर्णपणे खालावली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या टीमने Ricky Ponting बाबत माहिती ही दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ऑस्ट्रेलियामध्ये सध्या द्विपक्षीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर Ricky Ponting ची तब्येत अचानक खालावली. यावेळी पाँटिंगला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी Ricky Ponting शेवटच्या सत्राच्या कॉमेंट्रीसाठी पोहोचला नव्हता. यादरम्यान त्याला चक्कर येत होती आणि खूप अस्वस्थ वाटत होते. पाँटिंग असा अचानक अस्वस्थ असल्याचे पाहून सहकारी समालोचकाने मदतीसाठी लोंकाना हाक मारली. जयनंतर पाँटिंगला तातडीने पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे नवीन व्याजदर
FD Rates : ‘या’ 2 बँकांनी FD वरील व्याजदरात केला बदल, जाणून घ्या नवीन व्याजदर
RBI ने लॉन्च केला Digital Rupee, जाणून घ्या कुठे खरेदी करता येईल ???
IDFC First Bank कडून एफडीवर मिळणार 7% पेक्षा जास्त व्याज, अशा प्रकारे करा गुंतवणूक
Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा