हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महारष्ट्रात अनेक मोठ – मोठे प्रकल्प तयार केले जात आहेत. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा प्रचंड वाढताना दिसून येत आहेत. हीच दळणवळणाची सुविधा वाढवण्यासाठी नवीन वर्षातही नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे सोलापूरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा संपवण्यासाठी शहराबाहेर रिंग रोड तयार केला आहे. हा रूट नेमका कसा असेल याबद्दल जाणून घेऊयात.
दोन वर्षात तयार केला रिंग रोड
सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा सामान्य माणसाला सतावत होता. त्यामुळे यावरती उपाय म्हणून रिंग रोडचा पर्याय वापरण्याचे ठरले आणि 2022 मध्ये सुरु झालेला हा प्रकल्प आता पूर्ण झाला असून दोन वर्षात हा रोड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना येणारा वाहतुकीचा अडथळा कायमचा दूर होणार आहे.
सोलापूर शहरातील पाच विभाग शहरांशी जोडला जाणार रिंग रोड
सोलापूर शहराच्या बाह्य भागात तयार झालेला रिंग रोड एकूण 45 किलोमीटरचा आहे. या मार्गाच्या निर्मितीमुळे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मधील शेतकऱ्यांसाठी वाहतूक ही सोयीची होणार असून याचा फायदा त्यांना मालवाहतूकीसाठी होणार आहे. हा मार्ग केगांव ते हगलूर असा आहे. त्यामुळे एकूण पाच विभाग शहरांशी मार्ग जोडला जाणार आहे.
9 नोव्हेंबर 2023 ला काम पूर्ण करण्यात आले
सोलापूर मधील या रिंग रोडचे काम ओझोनलॅंड एमइपी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून 9 नोव्हेंबर 2023 रोजीच पूर्ण करण्यात आले आहे. शेगाव, देगाव, बेलाटी, कवठे, सोरेगाव, कुंभारी अशी अनेक गावे सोलापूर मार्गाला जोडली जाणार आहेत. त्यासाठी 20 मे 2023 मध्येच कंपनीला काम देण्यात आले होते. या रिंग रोडचे काम आता पूर्ण झाले असून सर्वसामान्यांच्या मागणीप्रमाणे हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या मार्गामुळे होणाऱ्या जड वाहतुकीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.