वाह रिंकू.. वाढदिवस साजरा न करता वाटले ३०० कुटुंबांना नेब्युलायझर; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूचा काल २०वा वाढदिवस होता. सध्या कोरोनाचे संकट सर्वत्र थैमान घालत आहेत. यामुळे रिंकूने तिचा वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला. एवढेच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांना मदत करत तिने सामाजिक बांधिलकीही जपली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वाफ घेण्याचे मशीन देण्याचा निर्णय रिंकूने तिच्या पालकांसह घेतला. रिंकूच्या या निर्णयामुळे तिचे सोशल मीडियावर भरभरून कोतुक होत आहे. तसेच रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल भरभरून प्रेम व आभार मानत धन्यवाद म्हटले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूंच्या आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने घरगुती साजरा केला असला तरी सामाजिक बांधिलकीचे तिने भान ठेवले आहे. पालकांच्या साहाय्याने तिने महाळुंग परिसरात असलेल्या मायनर, मुंडफणेवाडी, भोसलेवस्ती, काळेवस्ती, घारमाळकरगट, रेडेवस्ती, जमदाडेवस्ती, लाटेवस्ती, श्रीपूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाफ घेण्याच्या मशिनचे वाटप स्वहस्ते केले आले. यावेळी रिंकू सोबत जिल्हा परिषदेचे अधिकारी, शिक्षक, संबंधित कर्मचारी आणि रिंकूचे पालक स्वतः देखील उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/CPr4_5vJlkA/?utm_source=ig_web_copy_link

सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने विशेष करून आपल्या लुककडे अतिशय लक्ष दिले. त्यानंतर ती फिटनेसच्या बाबतीत इतकी सतर्क झाली आहे कि आज तिच्या ग्लॅमरपुढे अनेक अभिनेत्री फिक्या वाटू लागलया आहेत. तीने सैराट व्यतिरिक्त कागर, मेकअप या मराठी चित्रपटातही काम केले. या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही मात्र तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा नियुर्मान केली. त्यानंतर तिने लारा दत्ता सोबत हंड्रेड या वेबसीरिजमध्येही काम केले. या सीरिजमध्ये तिने साकारलेली नेत्रा पाटील प्रेक्षकांना अतिशय आवडली होती. तसेच ती अनपॉज्ड या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील हिंदी चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये ती दिसली होती. आता लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Leave a Comment