रिषभ पंतची वादळी खेळी, दिग्गजांनी केला कौतुकांचा वर्षाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या ऋषभ पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्यामुळेच भारताने चहापानाच्या वेळेपर्यंत ५ बाद २८० धावांपर्यंत मजल मारली. आता शेवटच्या सत्रात विजयासाठी भारताला १२७ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ५ बळींची गरज आहे.

सुरूवातीला सावध खेळ करणाऱ्या पंतने नंतर मात्र वादळी फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.

त्याच्या या खेळीचे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक दिग्गज फलंदाजांनी त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळली.

 

 

शेवटच्या सत्रात आता विजयासाठी भारताला १२७ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ५ बळींची गरज आहे. आता शेवटच्या सत्रात रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी आणि रविंद्र जाडेजा यांच्यावर भारताची मदार आहे. जाडेजा दुखापतग्रस्त असला तरी गरज पडल्यास तो फलंदाजीला येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment