‘देवा.. घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव..’! विलासराव देशमुख यांच्या आठवणीने गहिवरले रितेश- जेनेलिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज (२६ मे) ७५वी जयंती आहे. साहजिकच त्यांच्या आठवणीने त्यांचे कुटुंबीय हळवे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवशी त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि सून जेनेलिया डिसुजा देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहीत शेअर केल्या आहेत. रितेशने वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करीत देवाला घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याची विनंती केली आहे. तर बाप लेकीची ही मिठी चिरंतर राहील, अशा आशयाचे कॅप्शन देत जेनेलियाने एक पोस्ट शेअर केली आहे. या दोघांच्याही पोस्ट पाहिल्यानंतर विलासरावांच्या आठवणीने पुन्हा एकदा महाराष्ट्र हळवा होताना दिसत आहे.

रितेशने बाबांसोबतचा एक जुना फोटो शेअर करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोबत लिहिले कि, ‘देवा कृपा कर आणि घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव… तुमच्या आठवणी शिवाय एकही दिवस जात नाही बाबा… हॅपी बर्थ डे…,’. गेल्यावर्षी रितेशने आपल्या वडिलांच्या अर्थात विलासरावांच्या ७५व्या जयंतीदिनी एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला होता.

https://twitter.com/Riteishd/status/1265145930212413441

विलासरावांचे जॅकेट न्याहाळताना त्यातून त्यांचा हात बाहेर येतो आणि रितेशच्या डोक्यावरून मायेने फिरतो, त्याची पाठ थोपटतो, असा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ रितेशने सोशल मीडियावर शेअर केला होते. या व्हिडिओतील काल्पनिक का असेना पण बाप-लेकाची ही गळाभेट पाहताना अनेकांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते.

रितेश तर लेक म्हणून भावुक होतोय पण जेनेलिया सून असली तरीही लेकीसारखीच देशमुखांच्या घरात नांदतेय. यामुळे सास-यांच्या आठवणीने जेनेलियालाही भरून आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वडिलांच्या जागी असलेले सासरे विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जेनेलियानेही दरवर्षीप्रमाणेच खास फोटो शेअर करत जुन्या पण निरंतर आठवणींना उजाळा दिला आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा, आम्ही रोज तुमची आठवण काढतो. बापलेकीची ही मिठी चिरंतर राहील, असे कॅप्शन देत जेनेलियाने विलासरावांना मारलेल्या मिठीचा एक हलवा क्षण टिपलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो रितेश आणि जेनेलियाच्या लग्नातील आहे. रितेशनेही हा फोटो रिट्वीट केला आहे.

Leave a Comment